जळगाव प्रतिनिधी । मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात एक नवीन गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे याप्रसंगी बोलतांना सांगितले. बीएचआर सहकारी बँक घोटाळ्यात एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सूतोवाच केले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन बीएचआर घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल ११०० कोटी रूपयांची असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. यानंतर त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात अजून एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. बीएचआर प्रकरणात लवकरच एका मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, बीएचआर घोटाळ्यात अनेक नेते अडकले असून ही एक संपूर्ण टोळीच आहे. यातील एका बड्या नेत्यावर दोन दिवसात गुन्हा दाखल होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. दरम्यान, आता हा बडा नेता कोण ? याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.