मेष : घरगुती कामासाठी छोटे प्रवास करावे लागतील हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. आपले मानसिक स्वास्थमेष : घरगुती कामासाठी छोटे प्रवास करावे लागतील हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. आपले मानसिक स्वास्थसुधारेल. अधिकारावर असणाऱ्या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. अनावश्यक खर्च उद्भवतील.
वृषभ : गुंतवणूकीस अनुकूल दिवस आहे. अपेक्षित पत्रे येतील. कामासाठी परप्रांतीशी केलेली बोलणी यशस्वी होतील. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.
मिथुन : आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य घडल्याने प्रतिष्ठा मिळेल. भावडांच्या कामासाठी छोटासा प्रवास करावालागेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल.
कर्क : संततीस शैक्षणिक क्षेत्रात पारितोषिक मिळेल. आध्यात्मिक लिखाणास आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास योगातूनव्यवसायासंबंधी भाग्यकारक घटना घडेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.
सिंह : आपल्याला मित्र परवाराचे सहकार्य लाभेल. स्वतचे म्हणणे दुसर्यांवर लादू नका. आपण आज केलेल्या प्रवासामुळेइच्छापुर्ती घडेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल.
कन्या : पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आपल्या व्यक्तिमत्वाचा समाजात प्रभाव पडेल. व्यवसायात भाग्यवृद्धीघडेल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतःचे काम स्वतःच करावे.
तूळ : व्यवसायात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे भाग्यवृद्धी होईल. मौल्यवान वस्तूखरेदीस अनुकूल दिवस आहे. नोकरीतवरिष्ठ आपल्या मागण्या मान्य करतील. आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.
वृश्चिक : वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. आपले अंदाज चुकतील. सामाजिक पत उंचावेल. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. गुप्तवार्ता कानी येतील.
धनू : वैवाहिक सौख्य लाभेल. भागिदारी व्यवसायात भागिदारामुळे कार्यक्षेत्रात वाढ होईल. शुभसमारंभात सहभागी व्हाल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील.
मकर : जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी राहीतल. नोकरीत सुसंधी चालून येतील. महत्वाचे निर्णय घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल.
कुंभ : नोकरीत नवीन कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. आजचा दिवस शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल आहे. आपल्या हातून चांगले लिखाण होईल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे.
मीन : शैक्षणिक दृष्ट्या भाग्यकारक घटना घडतील. कौटुंबिक समारंभास आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. अपेक्षित गाठीभेटी फायद्याच्या ठरतील. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल.थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.