Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बीएचआर प्रकरण: जामनेरचे पारस ललवाणी यांचीही चौकशी

by Divya Jalgaon Team
December 2, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करणार्‍या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना पुण्यात बोलावून दोन दिवस कसून चौकशी केली. बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांची चौकशी देखील करण्यात आली असून याबाबत अद्याप सविस्तर तपशील समोर आलेला नाही.

सोमवारी दुपारनंतर त्यांचा आणि त्यांच्या कार चालकाचा कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळे खळबळ उडाली होती. तर मंगळवारी रात्री मात्र ते जामनेर येथे येण्यासाठी निघाले आहेत. यामुळे त्यांना अटक झाली नसून त्यांची चौकशी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएचआर पतसंस्थेच्या अवसायनाच्या प्रक्रियेतच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर यांच्यासह आणखी सहा जणांच्या मागावर पोलीस आहेत. दरम्यान, याच प्रकरणी चौकशी करण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना पुणे येथे बोलावण्यात आले.

ते आपल्या कारचे चालक शिवाजी पाटीलला घेऊन पुण्याला रवाना झाले. सोमवारी दुपारी ते पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत होते. यानंतर मात्र त्यांचा संपर्क तुटला. तथापि, काल रात्री त्यांनी कुटुंबियांना संपर्क करून आपण जामनेर येथे येत असल्याचे सांगितले. पारस ललवाणी यांनी बीएचआरशी संबंधीत अनेक कागदपत्रे मिळवले असून आधी तक्रारी देखील केल्या आहेत. या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Share post
Tags: #Paras LalwaniBHRcrimeDivya JalgaonJalgaonJalgaon criem newsJalgaon Marathi NewsJamnerबीएचआर प्रकरण: जामनेरचे पारस ललवाणी यांचीही चौकशी
Previous Post

गोरखधंद्यात विवेक ठाकरेसह आता अन्य दलाल देखील समोर

Next Post

तालुक्यातील कानळद्यात एचआयव्हीग्रस्त जोडप्यांचा विवाह संपन्न

Next Post
नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

तालुक्यातील कानळद्यात एचआयव्हीग्रस्त जोडप्यांचा विवाह संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group