जळगाव – येथील केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २३ नोव्हेंबर २०२० ते २८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पायथॉन या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आय आय टी मुंबईच्या संयुंक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करून सॉफ्टवेअरची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन २२ विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या ऑनलाईन कार्यशाळेत पायथॉन सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पायथॉन सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कोडींग भाषेचा उपयोग करून विविध प्रकारचे नवनविन सॉफ्टवेअर कसे तयार करावेत याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
विद्यार्थ्यांनी ओपन फ्री सॉफ्टवेअरचा उपयोग जास्तीत जास्त करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. पी. राणे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार, विभागप्रमुख प्रा. कल्पेश महाजन यांचे सहकार्य लाभले. एफओएसएस सेन्टरचे कोओर्डीनेटर प्रा. अविनाश सूर्यवंशी, वर्कशॉप कोओर्डीनेटर प्रा. राहुल पाटील यांनी ऑनलाईन कार्यशाळेचे व्यवस्थापन केले.