मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. आज मतदान आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांड देशपांडे, शिवसेना
पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे शिक्षक मतदारसंघ – प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी, काँग्रेस
भाजपचे उमेदवार
तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कोण हे जाणून घेऊया
अमरावती शिक्षक मतदारसंघ – डॉ. नितीन धांडे
पुणे पदवीधर मतदारसंघ – संग्राम देशमुख
पुणे शिक्षक मतदारसंघ – जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – शिरीष बोरनाळकर
नागपूर पदवीधर मतदारसंघ – संदीप जोशी
अजून वाचा
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड