जळगाव प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा चुलत दिरांनी विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक जण जखमी झाला आहे.
28 नोहेंबर रोजी सकाळी 11 वाजता विवाहिता ही शेतातून घरी येत होती. त्यावेळी रस्त्यावर चुलत दिर मंगेश बुधा भराडी आणि संजय बुधा भराडी यांनी विवाहितेस आडवून मंगेश याने माझे तुझ्यावर प्रेम जुळले आहे. मला संबंध करू दे असे सांगून जवळीक करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या ठिकाणावरून मी पळून गेली. व पती, चुलत सासरे यांना याबाबत माहिती दिली.
नातेवाईक असल्याने पती व चुलत सासरे गुलाब जोगी हे त्यांना समजाविण्यासाठी आज सकाळी 8 वाजता गेले होते. त्याचे वाईट वाटून त्या दोघांनी पती व चुलत सासरे यांना दमदाटी केली. व चुलत सासरे यांना लाकडी दांडा डोक्यात मारून जखमी केले. विवाहिताने दिलेल्या फिर्यादी वरून दोघी भाऊ विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.