मेष : प्रवासाचे बेत ठरतील. महत्वाची पत्रे येतील. अपेक्षित गाठीभेटी घडतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.
वृषभ : आर्थिक उलाढाली होतील. प्रवास योग आपली प्राप्ती वाढवतील व्यवसायात मानसन्मान मिळण्याचे योग येतील. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.
मिथुन : मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचा योग आहे. मिष्टान्नभोजन मिळेल. महत्त्वाची बातमी समजेल. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. प्रवास सुखकर होईल.
कर्क : माहत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. मोठय़ा भांवडासंबंधीची सुवार्ता कानी येईल. कामासाठी अचानक प्रवासयोग संभवतात. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जूने मित्र भेटतील.
सिंह : अचानक आलेल्या अनुकूल संधीचा फायदा घ्या. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. आपले निर्णय योग्य ठरतील. नातेवाईकात गैरसमज निर्माण होतील. प्रवासात त्रास, अचडणी येतील. मन अस्वस्थ होईल.
कन्या : नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. अचानक धनलाभाचे योग येतील. प्रवासयोग घडेल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल.
तूळ : नोकरीतील ताण कमी होऊन कामे मार्गी लागतील. जनसंपर्कातून विविध प्रकारचे लाभ होतील. आपले अंदाज अचूकठरतील. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक : महत्वाचे निणय घेण्याचे टाळावे. आपल्या कामात मित्रमैत्रिणींचा सल्ला घेऊ नका. अचानक परिचित व्यक्तिकडूनआर्थिक सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्वास निर्माण करेल.
धनु : विरोधकांवर मात कराल. व्यावसायिक येणे वसूल होईल. आजचा दिवस आपल्या आध्यात्मिक प्रगतीस अनुकूल आहे. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल.
मकर : व्यावसायिकांना अनुकूल संधींचा लाभ मिळेल. विरोधकांपासून सावधता बाळगा. उधारी उसनवारीचे व्यवहार टाळा. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल.
कुंभ : आपण घेतलेले महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संतती सौख्य लाभेल व संतीतीची शैक्षणिक क्षेत्रासंबंधीतील चांगलीबातमी समजेल. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे.
मीन : आपल्या घरी पाहुणे येण्यची शक्यता आहे. संतती सौख्य लाभेल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, जबाबदारीची कामे करावी लागतील. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे.