मुंबई – बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर ही तिर्थदीप रॉयसोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिर्थदीप जरी बंगाली असला तरी सईचे लग्न मात्र मराठमोळ्या पद्धतीने राजेशाही थाटात पार पडले आहे.
सई व तिर्थदीपचा ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सईच्या घरी त्यांचे लग्नाआधीच्या कार्यांना सुरुवात झाली होती. त्याचे फोटोस सई दररोज सोशल मीडियावर शेअर करत आहे. रविवारी लग्नाच्या आदल्या दिवशी पार पडलेल्या सीमांत पूजनात सई व तिर्थदीपने बंगाली पोषाख परिधान केला होता.
सोमवारी सकाळी साडे नऊच्या मुहुर्तावर सई व तिर्थदीप लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला जवळचे नातेवाईक व मित्र मैत्रिण उपस्थित होते. लग्नासाठी सईने गुलावी व हिरव्या रंगाची नव्वारी साडी नेसली होती. त्यात सई फारच सुंदर दिसत होती. तर तिर्थदीपने देखील मराठमोळा पेहराव केला होता.
https://www.instagram.com/p/CF1pwKCpctP/?utm_source=ig_embed