नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकला तर केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. मात्र आता अनेक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या येत आहेत.
त्यामुळे देशभरातील बँक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा वर्ष 2020 च्या शेवटच्या महिन्यात बँकांना बर्याच सुट्ट्या मिळणार आहेत. जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे अनेक बँक ग्राहकांच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशातील सर्व बँकांना ही 14 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. आपल्याकडेही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच बँकांच्या सुट्ट्यांबद्दल जाणून घ्या.
बँकांच्या सुट्ट्या 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यात कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची सुट्टी असेल. 3 डिसेंबरनंतर 6 तारखेला रविवारी असल्याने देशभरात बँकेची साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 डिसेंबर हा डिसेंबरचा दुसरा शनिवार असल्याने बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच रविवारी 13 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोंग पर्व, 18 डिसेंबर रोजी पुण्यतिथी यू सो सो थम आणि 19 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी असेल. यानंतर 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असेल.