जळगाव प्रतिनिधी । गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढलेली असतांना आज मात्र गत २४ तासांमध्ये बाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
गत २४ तासांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या चाचणीचे अहवाल आज सायंकाळी आले असून यात जिल्ह्यात ३६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर, आजच ४८ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. अर्थात, आज बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे.
आज जिल्ह्याचा विचार केला असता, आज एकूण ८१९ चाचण्या करण्यात आल्या. यात जळगाव शहरात १५ तर अमळनेर व भुसावळात प्रत्येकी ५ पेशंट आढळून आले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये चोपडा, धरणगाव, रावेर, पारोळा, भडगाव येथे प्रत्येकी एक तर पाचोरा, चाळीसगाव व बोदवड येथे प्रत्येकी दोन रूग्ण आढळून आले आहेत. आज एकूण दोन रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.