पुणे | पुणे शहरातील नवले पुलाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास आठ गाड्यांची धडक झालीये. या अपघातात एका मोठ्या टँकरने पेटही घेतला. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 8 गाड्या एकमेकांना धडकल्या.
या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जणं जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ब्रेक फेल झाल्याने चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर हा ट्रक रस्त्यावर असलेल्या इतर वाहनांना जाऊन धडकला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची आणि इतर जखमींची ओळख अजून पटलेली नाही. अपघातामध्ये पेट घेतलेल्या वाहनाची आग अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून विझवण्यात आलीये.