Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सुनील झंवर यांचे गिरीश महाजन व उन्मेष पाटलांसोबतचे फोटो व्हायरल

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव, राजकीय
0
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

जळगाव –  बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे, याप्रकरणी चौकशीला वेग येत असतांना आता दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून यावर तुफान चर्चा  होऊ लागले आहे.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी आता सुनील झंवर यांच्या भोवतीचा पाश आवळला जात असतांना त्यांच्या राजकीय लागेबांध्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. झंवर हे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच मंत्रीपदाच्या कालावधीत झंवर यांना अनेक शासकीय कामे मिळाली होती. बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून सुनील झंवर यांचे नाव समोर आल्याने आता त्यांचे राजकीय कनेक्शन देखील चर्चेत आले आहे.

सुनील झंवर हे प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी त्यांचे अतिशय वरिष्ठ नेत्यांपर्यंतचे संबंध होते. यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही प्रत्यक्षात गिरीश महाजन यांच्यावर आघात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  या पार्श्‍वभूमिवर आता सोशल मीडियात सुनील झंवर यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

जळगाव येथील माल धक्का हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे स्थलांतरीत  करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली होती. याप्रसंगी या दोन्ही मान्यवरांसोबत सुनील झंवर यांचीही उपस्थिती होती. यामुळे झंवर हे भाजप नेत्यांच्या खास मर्जीतले असल्याचे दिसून आले होते. आता तेच फोटो नव्याने सोशल मीडियात विरोधकांनी शेअर केले असून यावर जोरदार चर्चा होत आहे. तसेच  याबाबत अद्यापही भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

तर याप्रकरणी  आज माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सायंकाळी पत्रकार परिषद घेणार असून यात ते नेमका काय धमाका  करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: BHRcrimeDivya JalgaonGirish MahajanJalgaonPolitical NewsSunil ZawarUnmesh Patilसुनील झंवर यांचे गिरीश महाजन व उन्मेष पाटलांसोबतचे फोटो व्हायरल
Previous Post

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 8 गाड्या एकमेकांना धडकल्या

Next Post

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीला मान्यता

Next Post
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीला मान्यता

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीला मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group