जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची २ डिसेंबर रोजी मह्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका व संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मह्त्वपूर्ण आढावा बैठक २ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कार्यालयात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस माजी विधानसभाअध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशअध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे काका, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार व सर्व फ्रंटलचे अध्यक्ष ,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, युवक, महिला व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील,व जिल्हा महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी केले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होणार असल्याने सगळ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.