जळगाव – औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, सिल्लोड येथून चोरीला गेलेल्या मोटारसायकली जळगाव जिल्ह्यात आणि पाचोऱ्यात असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानुसार वाहनांचा शोध घेतल्यावर चार वाहने पोलिसांनी जप्त केली असुन सदर संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी खुलताबाद पेालिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील (एमएच.२०.एफ.जे.६६२४) होंडा शाईन कल्पेश रविंद्र पाटील (वय-२८ रा.सावखेडा ता. पाचोरा) याच्याकडे मिळून आली. तर दुसरी होंडा शाईन (एमएच.२०एफएम.६९५०) शिवाजी करतारसिंग परदेशी (वय-४०,रा.सावखेडा ता. पाचोरा) याच्याकडे मिळून आली.
सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीची युनिकॉर्न (एमएच.२० एफडी.८५२१) कल्पेश रविंद्र पाटील यांच्या ताब्यात मिळून आली. तर, खुलताबाद येथून चोरीला गेलेली बुलेट (एमएच.२०एफआर९२७४) हि वरखेडी(ता.पाचोरा) बसस्टॅण्ड येथे असल्याच्या गु्पत माहितीवरुन गुन्हेशाखेचे निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या पथकातील अशोक महाजन, शरीफोद्दिन काझी, युनूस शेख, किशोर राठेाड, विनोद पाटील, रणजीत जाधव यांच्या पथकाने चारही वाहने जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले आहे.