Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉलरमध्ये घसरण, सोने स्वस्त तर बेस मेटल – कच्च्या धातूंना मिळाला आधार

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in राष्ट्रीय
0
डॉलरमध्ये घसरण, सोने स्वस्त तर बेस मेटल - कच्च्या धातूंना मिळाला आधार

नवी दिल्ली- कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातल्याने मनुष्यहानी तसेच आर्थिकहानी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच  जागतिक बाजारपेठेवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे  अमेरिकन डॉलरच्या मूल्यात देखील घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. याउलट बेस मेटल आणि कच्च्या धातूंना आणखी आधार मिळाला. अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक व सदस्यांनी सातत्याने उत्पादन कपात केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. चीन या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ग्राहकाकडून मागणीत भरपूर वाढ झाल्याने तांब्याचे दर वाढले असल्याचे दिसून येते.

सोनं –  कोविड – १९ वर येणाऱ्या लसीमुळे सध्या  पिवळ्या धातूवर परिणाम होऊन  त्याचे दर काहीप्रमाणात  म्हणजेचा ०. १२% नी घसरले व ते १८०५ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. तसेच  अमेरिकेतील रोजगारात अचानक वृद्धी झाल्याच्या दाव्यांमुळे या घसरणीवर मर्यादा आल्या. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील कामगार बाजारावर साथीचा सातत्याने परिणाम होत असून अनेक लोक बेरोजगारीचे दावे करत आहेत. जागतिक मध्यवर्ती बॅंका अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणेसाठी व्याजदर कमीच ठेवण्याचा अंदाज आहे. त्यामुळेही सोन्याला आधार मिळाला. ज्यो बायडेन यांच्या हस्तांतरणासह, कोविड- १९ लसीच्या आशेमुळे पिवळ्या धातूचे दर आणखी काही प्रमाणात घसरले.

कच्चे तेल – अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडने १. ८ % ची वृद्धी घेतली व ते ४५. ७  डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. करोनाशी लढणाऱ्या लसीच्या आशेमुळे या दरांना आणखी आधार मिळाला. यू.एस. एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड स्टॉकपाइल्स

७४५,०००  टनांनी वाढले. आगामी काही महिन्यांमध्ये ओपेक आणि सदस्यांकडून क्रूड उत्पादन कपातीचा अंदाज आहे, त्यामुळे तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. घसरते तेलमार्केट आणि कमकुवत मागणी यामुळे ओपेक व सदस्यांकडून जानेवारी २१ पर्यंत उत्पादन कपात मागे घेतली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ऑक्‍टोबर २०२० मध्ये अमेरिका व युरोपमधील आर्थिक कामकाजात वाढ झाल्यानेही तेलाच्या दरांना आधार मिळाला तसेच बाजारात सकारात्मक भावना वाढीस लागल्या.

बेस मेटल्स –  सध्या बेस मेटल्समधील मागणीच्या चिंतेमुळे एलएमईवर धातूने संमिश्र संकेत दर्शवले. करोना विषाणूचा विविध जागतिक अर्थव्यवस्थांमधील कोरोनाच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीच्या आशावादानंतरही निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बेस मेटल्सचे दर घसरले. वर्ल्ड स्टील असोसिएशनने जागतिक क्रूड स्टील उत्पादन ऑक्‍टोबर २०२० मध्ये १६२ दशलक्ष टन झाल्याचे नोंदवले. मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे ७ टक्के जास्त झाले. कारण चीनबाहेरील उत्पादन प्रक्रियांमध्ये सुधारणा झाली. इंटरनॅशनल लीड व झिंक स्टडी ग्रुपच्या अहवालानुसार, ग्लोबल झिंक मार्केट सप्टेंबर २०२० मध्ये ३३,१०० टन एवढ्यावर होते.

तांबे –  तसेच  चीनमधून लाल धातूच्या वाढत्या मागणीमुळे एलएमई कॉपरचे दर ०. १०  टक्‍क्‍यांनी वधारले व ते ७,३०० डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन झाल्यानेही दरांना आधार मिळाला. तसेच  जगात झपाट्याने वाढणाऱ्या करोना विषाणूच्या रुग्णांमुळे लाल धातूच्या मागणीबाबतही चिंता आहे. त्यामुळे धातूच्या नफ्यावर मर्यादा आल्या. मॉडर्ना, फायजर तसेच ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांनी साथीविरोधात लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत प्रगती असल्याचे नोंदवले. कोविड-१९ वरील संभाव्य लसीच्या आशेमुळे भविष्यात तांब्याच्या मागणीत वाढ होईल.

म्हणजेच  अर्थव्यस्था वाढू लागल्यानंतर उद्योगांत धातूचा वापर वाढत असतो. त्यामुळे विविध देशाचे विकास दर वाढू लागल्यानंतर धातूचे दर वाढतात आणि या कंपन्याच्या शेअरच्या भावातही वाढ होत असते. त्यामुळे आगामी काळात धातू क्षेत्रातील गुंतवणूकही वाढू शकते असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

Share post
Tags: Divya JalgaonMarathi NewsNew DelhiNew Delhi latest newsडॉलरमध्ये घसरणसोने स्वस्त तर बेस मेटल - कच्च्या धातूंना मिळाला आधार
Previous Post

पाचोरा येथील बेसिक इंग्लिश कोर्स पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

औरंगाबादमधील चोरीच्या चार मोटारसायकली जळगावात जप्त

Next Post
औरंगाबादमधील चोरीच्या चार मोटारसायकली जळगावात जप्त

औरंगाबादमधील चोरीच्या चार मोटारसायकली जळगावात जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group