पाचोरा, प्रतिनधी । सत्यम इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश एज्युकेशन ऍ़ण्ड रिसर्च सेंटरचे संचालक व सामाजिक कार्यकर्ता निळकंठ पाटील लिखित बेसिक इंग्लीश कोर्स भाग-१ या वर्षभराच्या मालिकेच्या पहिल्या भागाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे होते.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, पोलिस उप अधिक्षक ईश्वीर कातकडे, जि.प. सदस्य दिपक राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील, चरणसिंग राठोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. राजेंद्र चौधरी यांनी केले. प्रस्तावना राजेश पाटील यांनी तर आभार भुषण वानखेडे यांनी मानले. निळकंठ पाटील यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, कोरोना काळात लॉकडाऊन मुळे मुले शिक्षणापासून वंचीत आहे. प्रत्येक तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून इंग्रजीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने बेसिक इंग्लीश या पुस्तकाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगीतले. याच उद्देशातून प्रत्येक गावातून दोन पात्र गरीब विद्यार्थ्यांना सदरील बेसिक इंग्लीश कोर्सकरीता दत्तक घेतले जाईल असे सांगीतले.
तसेच पाचोरा व भडगांव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांना सदर कोर्सकरता दत्तक घेतले जाईल असे आश्वाकसन देखील दिले. या पुस्तकाच्या निर्मीतीसाठी चौधरी प्रिंटींग प्रेसचे संचालक श्री स्वप्नील चौधरी तसेच वैभव कॉम्प्युटर्सचे संचालक श्री भुषण वानखेडे यांचे विशेष परिश्रम व सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाप्रसंगी ऍ़ड. सचिन देशपांडे, ऍ़ड एल. एस. परदेशी, डॉ. संतोष पाटील, किशोर बारावरकर, भडगांवचे संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे व रविंद्र भावसार तसेच परिसरातील सन्माननिय व्यावसायिक, शिक्षकवृंद व नागरीक उपस्थित होते.