जळगाव – काही दिवसांपासून जिल्ह्यात बीएचआर संस्था प्रकरण चांगलंच गाजत आहे. कालच एकनाथराव खडसे यांनी प्रतिपादन केले होते कि, ‘आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी संपल्यावर पत्रकार परिषद घेऊन बीएचआर संदर्भातील शासनाकडे केलेल्या तक्रारीचा संपूर्ण पत्रव्यवहार देणार असून या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, तसेच माजी मंत्री यांचे देखील रेकॉर्ड देणार ‘.
याच पाश्र्वभूमीवर बीएचआर संस्था प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे आज सायंकाळी चार वाजेला पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान, आज खडसे नेमका आज काय धमाका करतात तसेच कुणा-कुणाची नावं घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने यादरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून दोन दिवसात ही सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन देतो, असे एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर, या प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती आपल्याकडे असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले होते.
तसेच दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी ‘बीएचआर’पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक हा अत्यंत मोठा गुन्हा असून यात शेकडो जण गुंतलेले आहेत.राज्यात फडणवीस यांचे सरकार असतांना त्यांनी हे प्रकरण दडपले गेल्याचाही आरोप खडसे यांनी केला होता. दरम्यान, आज खडसे पत्रकार परिषदेत काय बोलतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून आहे.