मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद.
त्याचप्रमाणे उद्या उर्मिला ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत. आणि त्यानंतर 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे.
शिवसेनेतर्फे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचं पक्क झालंय.
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.