Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

by Divya Jalgaon Team
November 29, 2020
in जळगाव
0
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

जामनेर, प्रतिनिधी – क्षत्रिय माळी समाज संघटना पहुर कसबे ता. जामनेर यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत जामनेर तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत खुला गटातून उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी यश मिळवून तृतीय क्रमांक पटकविला. महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालय पहुर कसबे येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

क्षत्रिय माळी समाज संघटनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाल गट, किशोर गट व खुला गट अशा तीन गटात तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात खुला गटासाठी कोरोना नंतरचे जग, भ्रष्टाचार एक भीषण समस्या व शेती आणि आजची आर्थिक अर्थव्यवस्था हे तीन विषय निबंध लेखन स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. यात संदिप पाटील यांनी कोरोना नंतरचे जग याविषयावर निबंध लेखन केले व या निबंधास तृतीय क्रमांक मिळाला.

संदिप पाटील यांनी यापूर्वी देखील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे, या यशाबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsJamnerMarathi Newsमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन
Previous Post

जळगावातील सबजेलमधून फरार आरोपी पहुर पोलीसांच्या जाळ्यात

Next Post

पिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड

Next Post
पिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड

पिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group