मुंबई | राज्यावरचं कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात शनिवारी ५,९६५ नवीन रुग्णांचं निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.
राज्यात ५,९६५ नवीन रुग्णांची नोंद झालीये. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,१४,५१५ झालीये. शनिवारी ३,९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,७६,५६४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४ % एवढे झाले आहे.
राज्यात काल ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ % एवढा आहे. तर सध्या राज्यात ५,२८,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


