रायपूर : छत्तीसमडमधील रायपूरमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नितीन भालेराव माओवादी हल्ल्यात शहीद झाले आहे. त्यांच्यासह या हल्ल्यात दहा जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रायपूर येथील सुकमा ताडमेटलामध्ये माओवाद्यांनी IED स्फोट घडवला आहे. माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 10 जवान जखमी झाले आहे. या स्फोटात सहाय्यक कमांडेट नितीन भालेराव हे शहीद झाले.
कोबरा बटालियन 206 चे अधिकारी असलेले नितीन भालेराव हे जवानासोबत अभियानावरुन परतत असताना गंभीर जखमी झाले होते. राञी हेलीकॉप्टरने उपचारासाठी रायपुरला हलवले त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शहीद नितीन भालेराव गेल्यावर्षी पास आऊट होऊन कोबरा बटालियनमध्ये दाखल झाले होते.
कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते. रात्री परत येत असताना साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या अॅम्बुशमध्ये जवान फसले. यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात दहा जवान जखमी झाले आहेत.
जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल करणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीनं 8 गंभीर जखमी झालेल्या जवानांना रायपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. पीपल पीपल्स गुरील्ला आर्मी दोन डिसेंबरपासून सुरू होण्याच्या पार्श्वभुमीवर माओवाद्यानी हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.
#UPDATE Chhattisgarh: Assistant Commandant Nitin Bhalerao, of CoBRA 206 battalion of CRPF, succumbs to his injuries from an IED blast by naxals near Tadmetla area of Sukma district yesterday.
Seven other personnel injured. https://t.co/asaWd3Pb1j
— ANI (@ANI) November 29, 2020
गडचिरोली भामरागड तालुक्यात 26 नोव्हेंबरला माओवाद्यांनी लाहेरी-भामरागड मार्ग बंद पाडून माओवाद्यांनी एसटी बस अडवली होती. या मार्गावर झाडे तोडून पीपल्स गुरील्ला आर्मी सप्ताह साजरा करण्याचे बॅनर्स माओवाद्यांनी लावले होते. आलापल्लीहून लाहेरीकडे जाणारी बस रात्री उशिरा माओवाद्यांनी हिंदेवादा जवळ अडवली होती.