चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सिव्हील इंजिनिअरच्या बंद घरातून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सिव्हील इंजिनिअरचे बंद घरात अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोकड असा एकुण ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले. चाळीगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
चाळीसगावातील सिव्हील इंजिनिअर निलेश सुवाला कांकरिया (वय-३७) रा. नारायण वाडी येथील रहिवाशी आहेत. २४ ते २७ नोव्हेंबर रोजी दरम्यान खासगी कामाच्या निमित्ताने घराला कुलुप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने, सहा किलो चांदी आणि रोकड असा एकुण ३ लाख १० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे २७ रोजी उघडकीस आले.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसाव धाव घेवून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी निलेश कांकरिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दांडगे करीत आहे.