जळगाव – शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यायात विद्यार्थी विकास विभाग व ग्रंथालय विभागा च्या संयुक्त विद्यमाने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ..ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जंयती वाचन प्रेरणा दिन म्हणुन ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
त्या निमित्त डॉ..कलाम यांचे प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ..आर.बी.वाघुळदे यांचे हस्ते अभिवादन करण्यात आले. प्रा.देवयानी पाटील यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय व त्यांचे प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच कु.मेघना बाविस्कर या विद्यार्थिनीने डॉ. कलाम यांचे ग्रंथ विंग्ज ऑफ फायर , इंडिया २०२०, माय जर्नी ,टर्निंग पॉईंट यांच्या वाचना विषयी विचार मांडले. तसेच प्रतीक्षा टोके ह्या विद्यर्थिनीने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रियंका ब-हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. सुनील पाटील यांनी केले सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी वाघुळदे , क्रीडा संचालक डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.करिश्मा काळे, सहयाक ग्रंथपाल प्रविण अंबुसकर, व महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.