जळगाव – के.सी.ई.सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो.सुरुवातीला डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी दामोदर चौधरी याने माहीती दिली. त्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी “पाठ्यपुस्तक अभिवाचन स्पर्धा ” आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठ्यपुस्तकातील त्यांना आवडेल त्या पाठाचे अभिवाचन सादर केले . मराठी , हिंदी, इंग्रजी, या पाठ्यपुस्तकातील पाठाचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी केले.स्पर्धेचे परीक्षण सुचेता शिरसाठ, माधुरी भंगाळे, डी.बी.चौधरी यांनी केले.स्पर्धेतील विजेत्यांचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी अभिनंदन केले .स्पर्धेतील विजयी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
इयत्ता ५वी:-
प्रथम क्रमांक:-करण भूषण पाटील
द्वितीय क्रमांक:-भाग्यश्री चंद्रकांत पाटील
तृतीय क्रमांक:-विवेक गजानन थोरात
इयत्ता ६वी :-
प्रथम क्रमांक:-दामोदर धनंजय चौधरी
द्वितीय क्रमांक:-अंकीता कीरण लोहार
तृतीय क्रमांक:- भार्गवी जगन्नाथ भंगाळे
इयत्ता ७वी :-
प्रथम क्रमांक:-तन्मया रमेश पाटील
द्वितीय क्रमांक:-अथर्व प्रकाश ब्रम्हक्षत्रिय
तृतीय क्रमांक:- श्रृती सुभाष महाजन
भूषण वसंत भोसले