पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात उपस्थित राहणार नाहीत. राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतात. पण यावेळी कोणीही उपस्थित राहू नये, अशा पीएमओकडून सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल आणि सीएम ठाकरे उपस्थितीत नसणार असे समजते.
अजित पवार हे देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नसणार आहेत. अजित पवार यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील स्वागत करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालय माहिती दिली आहे. शरद पवार यांचा ही तुर्तास बारामती येथे नियोजित कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयातून देण्सात आली आहे.
मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधन कार्याचा आढावा घेणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला मोदी या निमित्तानं धावती भेट देणार आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला मोदी दुपारी भेट देणार आहेत. तिथे ते कोरोना प्रतिबंधक लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत
त्या आधी सकाळी मोदी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट देतील. अहमदाबादमधल्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाला सकाळी साडे नऊ वाजता भेट देणार आहेत. तिथे ते सुमारे तासभर असतील.


