जळगाव प्रतिनिधी । येथील बीएचआर मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेतील अपहार प्रकरणी रात्री उशीरापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणी चौकशी सुरू होती. यात बीएचआर संस्थेचे सीए धरम सांखला, महावीर वाणी, ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे व बीएचआर संस्थेतील कर्मचारी सुजीत वाणी या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीएचआर अपहार प्रकरणी चौघे ताब्यात; रात्री उशीरापर्यंत चौकशी.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटव्ही बँकेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत असलेली देणी न देण, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याबाबत पुणे शहर व पुणे ग्रामाणी पोलीस ठाण्यात याआधीच दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून याच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने शुक्रवारी गुन्ह्याशी संबंधित बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे ( रा. शिवाजीनगर), उद्योजक सुनील देवकीनंदन झंवर (रा. ५२ सुहास कॉलनी जयनगर), महावीर जैन, धरम सांखला (रा. शिवकॉलनी) आणि ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे (रा. देवेंद्र नगर) यांच्या घरांवर छापे टाकले. कारवाईत पथकाकडून संबधितांचे कार्यालय, फर्म यांचीही चौकशी करण्यात आली.
उशीरापर्यंत पथकाकडून चौकशी सुरु होती. सलग तीन दिवस ही चौकशी चालणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. बीएचआरमधील अपहार प्रकरणात पुणे शहर व ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा येथे जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर, बीएचआरचे सी.ए. महावीर जैन व धरम सांखला यांच्याविरोधात दोन स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार अंत्यंत गोपनीय पध्दतीने शुक्रवारी सकाळीच एकाचवेळी पाच जणांच्या घरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकल्या. यासोबत बीएचआरचे एमआयडीसीतील मुख्य कार्यालय येथेही तपासणी करण्यात आली आहे. पतसंस्था संघटनेचे विवेक ठाकरे, बीएचआर संस्थेचे सीए धरम सांखला, महावीर वाणी, व अवसायक जितेंद्र कंडारे याचा निकटवर्तीय असणारा बीएचआर संस्थेतील कर्मचारी सुजीत वाणी या चौघांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.