जळगांव : येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयास राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ना.अॅड. यशोमती ठाकुर यांनी सदिच्छा भेट दिली. सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आ.शिरिषदादा चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले.
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी या संस्थेने 25 वर्षे पुर्ण करून नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षे साजरे केले. त्याबददल संस्थेचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी यांनी संस्थेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबददल त्यांना ना.अॅड यशोमती ठाकूर यांचे हस्ते मानपत्र प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर मानपत्राचे वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी केले. सदर प्रसंगी गोदावरी फौउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिपभैया पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डी.जी.पाटील, प्रभाकरआप्पा सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाय.जी.महाजन, तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिरिष मधुकरराव चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद होते.