जळगाव – जळगाव केंद्रावर माहे मे-2019 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी ऍड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल सचिव, जी.डी. सी.ॲड ए परिक्षा बोर्ड, व्दारा- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केला आहे. या परिक्षार्थीना निकालाचे वाटप 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.
तरी परिक्षार्थीनी माहे मे-2019 मध्ये जळगाव केंद्रावर जी.डी.सी ॲन्ड ए व सहाकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दिलेली आहे. अशा परिक्षार्थीनी निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र 15 डिसेंबर, 2020 पूर्वी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3 पहिला माळा, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावेत.
जे परिक्षार्थी दिनांक 15 डिसेंबर, 2020 पर्यत सदर निकालाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र प्राप्त करुण घेणार नाहीत. अशा परिक्षार्थींना निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र दिनांक 16 डिसेंबर, 2020 नंतर पोष्टाव्दारे पाठविण्यात येईल. असे संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी कळविले आहे.