जळगाव – समता नगर भागातील तरूण बाहेरून फिरून येतो असे सांगून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी आईच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप रामराव देशमुख (वय-३५ रा. समता नगर, जळगाव) हा टाईल फिटींगचे काम करतो. घरी आईवडीलांसोबत राहतो. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आईला बाहेर फिरून येतो. स्वयंपाक करून ठेव असे सांगून दिलीप देशमुख हे घराबाहेर पडले. रात्री उशीरापर्यंत न आल्याने नातेवाईकांनी मित्रमंडळी यांच्याकडे शोधाशोध करून मिळून आला नाही. गुरूवारी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतेली. आई मालाबाई रामराव देशमुख यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहे.