भुसावळ – केंद्र सरकारने घेतलेल्या कर्मचारी विरोधी धोरण, जन व राष्ट्र विरोधी निर्णयाच्या विरोधात झालेल्या या आंदोलनाचा भुसावळ शहर विभागात निदर्शने करण्यात आले. भुसावळातील मुख्य पोस्ट कार्यालय, आयुध निर्माणी येथे कर्मचार्यांनी निदर्शने केली. तहसील, प्रांत, नगरपालिका, महावितरण आदी कार्यालयांसह बँकांचेही कामे सुरळीत असल्याने या संपाचा सेवा किंवा शासकिय कामकाजावर परिणाम झाला नाही.
तसेच रावेरात महसूल कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी गुरूवारी कामबंद आंदोलन केल्याने विविध कामे घेवून आलेल्या नागरीकांना आल्या पावल्या परतावे लागले. या आंदोलनात हर्षल पाटील, प्रवीण पाटील, ए.एम.वानखेडे, के.पी.चौधरी, आय.आर.भारंबे, एम.बी.लडके, एस.जी.लोलपे, एच.व्ही.पाटील, एस.एम.खान, यमुना तावडे, किशोर चौधरी, सुनील सोनार, डी.एन.वानखेडे, एस.ए.झोटे, वाय.आय.तडवी, विठोबा पाटील, डी.व्ही.कांबळे, रवी शिंगणे आदीचा संपात सहभाग झाले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे भुसावळात पोस्टल व आरएमएस कर्मचार्यांनी एकदिवसीय संपात सहभाग नोंदवला. यामुळे टपाल वाटपासह अन्य कामे खोळंबली. नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्पॉईज युनियन भुसावळ विभागाने संपात सहभाग नोंदवला. मुख्य टपाल कार्यालयात युनियनचे पदाधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निदर्शने देवून विरोध नोंदवला. यावेळी विभागीय अध्यक्ष एम.एन.हसन, सेक्रेटरी एल.बी.माळी, महेश कोल्हे, सुरेश जाधव, ए.पी.गजरे, गोविंदा पाटील, रामकृष्ण निकम, पी.आर.महाजन आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याच पाश्र्वभूमीवर आयुध निर्माणीत देखील
संयुक्त राष्ट्रीय समितीच्या आदेशानुसार मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले, मात्र संपात प्रत्यक्ष सहभाग मात्र नव्हता. स्थानिक संयुक्त समिती चे संयोजक दिनेश राजगिरे, कामगार युनियनचे किशोर पाटील, नवल भिडे, प्रविण मोरे आदींनी सहभाग घेतला. या संपाला संरक्षण विभागाच्या ऑल इंडिया डिफेंन्स एम्लॉईज फेडरेशनने संपास पाठिंबा दिला असल्याची माहिती केंद्रीय उपाध्यक्ष तथा कामगार नेते राजेंद्र झा यांनी दिली.