जळगाव – हरिविठ्ठलनगर भागातील तडवी वाडा येथील सट्टापेढीवर रामानंदनगर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत रोख रकमेसह सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरातील तडवी वाडा येथील पार्टीशनच्या खोलीत एक जण सट्टाचे आकडे घेत सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
अनिल बडगुजर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी तात्काळ विनोद सोनवणे, चंदु पाटील, शिवाजी धुमाळ, होमगार्ड आकाश सपकाळे, अनिल पिंजारी यांचे पथक तयार केले. या पथकाने सट्टापेढीवर धाड टाकली असता, याठिकाणी सट्टयाचे आकडे घेणारा शब्बीर लालु पिंजारी (वय-५८ रा. हरिविठ्ठलनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ७१० रुपये रोख रकमेसह सट्टाचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.