जळगाव प्रतिनिधी । बचत गटाच्या नावाखाली १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक. बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवून १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सला रमेश पाटील (वय-५९) रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण शर्मा व संजय जयनारायण शर्मा (सर्व रा.सांगवी, ता.शिरपुर, जि.धुळे) हे गेल्या १५ वर्षांपासून वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याच्या वास्तव्याला होते.
ओळखीचे असल्यामुळे जोशी परिवाराने वत्सला पाटील यांनी माहिती नसतांना सून कामिनी रामकृष्ण पाटील यांच्याकडून मेडीकल दुकानाचे साहित्य घेण्यासाठी १५ हजार रूपये घेतले. त्यानंतर संगिता जोशी हिने वत्सला पाटील यांच्याकडून ५ जुलै २०१९ रोजी ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर ७ डिसेंबर २०१९ रोजी अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट खासगी फायनान्स येथे तारण ठेवून ६४ हजार ३७५ रुपये संगीता जोशी हिने घेतले.
आमच्याकडे पेट्रोल पंप असून खूप पैसे आहेत, तुम्हाला रोख पैसे देऊ, असे सांगितले. त्यानंतर फेब्रवारी २०२० मध्ये जोशी परिवार घराला कुलुप लावून निघून गेले. यानंतर परिसरातील इतर महिलांना उद्योग देण्याच्या नावाखाली महिलांच्या नावावर वेगवेगळ्या फायनान्सकडून कर्ज काढून फसवणूक केली आहे.
वत्सला रमेश पाटील (रा.आदर्श नगर), कामिनी रामकृष्ण पाटील (रा.आदर्श नगर), रत्ना ज्ञानेश्वर बारी (रा.मकरा पार्क), संध्या दिलीप घोडेस्वार (रा.मकरा पार्क), मथुराबाई भरतसिंग भोपाळावद (रा.मोहाडी रोड), कल्पना विजय नाथ (रा.शिरसोली नाका), कामिनी रामकृष्ण पाटील (रा.मकरा पार्क), सुवर्णा भुपेंद्र वानखेडे (रा.मकरा पार्क), विजया भास्कर वानखेडे (रा.मकरा पार्क), सायराबी समीर पठाण (रा.आदर्श नगर), रोशन बी शब्बीर खान (रा.शिरसोली नाका), आरेफा बी युनुस खा पठाण (रा.आदर्श नगर), सीमा चंद्रकांत सोनवणे (रा.शिरसोली रोड) व फैमादाबी शाकीर खा पठाण (रा.आदर्श नगर) आदींची एकूण १३ लाख ५० हजार २५० रुपयात फसवणूक झाली आहे.