जळगाव – महाराष्ट्र राज्यात उद्योजकतेच्या वाढीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जळगाव (MCED) जिल्हा सल्लागार समितीमध्ये निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात उद्योजकांना वाव आणि चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. उद्योगाला वाव देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये निधी ग्रुप ऑफ कंपनीच्या वैशाली विसपुते यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागार यांनी याबाबतचे पत्र नुकतेच वैशाली विसपुते यांना पाठविले आहे.