नवी दिल्ली – गुगल पेच्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारीपासून गुगल पे सेवेसाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. गुगल पीयर टू पीयर सुविधा बंद करून त्याबदल्यात इन्स्टंट मनी ट्रान्स्फर पेमेंट सिस्टिम लागू करणार आहे. यासाठी युजर्सना चार्ज भरावा लागणार असून हा चार्ज किती असेल हे स्पष्ट केलेले नाही. जानेवारीपासून वेब पेमेंट सर्विस काम करणार नसल्याची माहिती गुगलने दिली आहे. देशात गुगल पे हे नंबर एकचे अॅप असून जगभरातही त्याचे कोटय़वधी युजर्स आहेत.गुगल पेच्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; वाचा ही महत्त्वाची बातमी.
गुगल देणार घरबसल्या कमावण्याची संधी
कामाव्यतिरिक्त एक्स्ट्रा कमाई मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. आता गुगलच तुम्हाला घरबसल्या कमाई करण्याची संधी देणार आहे. गुगल सध्या हिंदुस्थानात टास्क मेट या अॅपची चाचणी करतेय. ज्याअंतर्गत युजर्सना आपल्या स्मार्टपह्नच्या मदतीने काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. त्याबदल्यात गुगल युजर्सना पैसे कमावण्याची संधी देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यात सहभागी होणाऱया युजर्सकडून गुगल कोणतेही शुल्क आकारणार नाही.
सीटिंग आणि फिल्ड अशा दोन प्रकारांत हे टास्क असतील. सिटींग टास्कमध्ये एखादे वाक्य स्थानिक भाषेत ट्रान्सलेट करणे, काही वाक्य रेकॉर्ड साठी मदत करणे अशी कामे असतील. टास्क पूर्ण केल्यावर युजर्सच्या ई वॉलेटमध्ये पैसे जमा होणार आहे. सध्या हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असले तरी गुगलने टास्क मेटमध्ये सहभागी होण्यासाठी निवडक युजर्सनाच आमंत्रित केले आहे.