Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरू

by Divya Jalgaon Team
November 26, 2020
in राज्य, शैक्षणिक
0
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून २६ नोव्हेंबरपासून ती सुरू हाेईल. सद्यस्थितीत शिक्षण संचालनालयाने नियमित फेरी २चे वेळापत्रक जाहीर केले असून, नियमित फेरी ३ व विशेष फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. या प्रक्रियेदरम्यान प्रवेश शुल्क, प्रवेश निश्चिती ऑनलाइन करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.आजपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरू.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश या वेळापत्रकानुसारच हाेतील. यापूर्वी एसईबीसी वर्गातून अर्ज भरलेल्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर वर्ग बदलाची संधी दिली जाईल. नियमित फेरी २ साठी विद्यार्थ्यांना या दरम्यान अर्ज करायचे असून, त्यांना पसंती क्रमही बदलता येतील.

पाच डिसेंबरला जाहीर होणार दुसरी यादी

५ डिसेंबर सकाळी ११.३० वाजता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, दुसऱ्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर पाहता येतील. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करता येईल. याच दरम्यान महाविद्यालयांतील व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहणार आहेत. संकेतस्थळावर झालेले प्रवेश नोंदविण्यास कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ दिला जाईल. १० डिसेंबरला तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.

Share post
Tags: 11 thDivya JalgaonEducationhttps://mumbai.11thadmission.org.inMumbaiMumbai Latest NewsMumbai Marathi newsMumbai NewsOnline Admissionआजपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरू
Previous Post

मुस्लिम खाटिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

गुगल पेच्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

Next Post
गुगल पेच्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; वाचा ही महत्त्वाची बातमी

गुगल पेच्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group