जळगाव – शहरात अमृत योजनेंतर्गत प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जोडणी दिली जात आहे. नळाला मीटर बसविण्यासंदर्भात बुधवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली.
मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीला महापौर सौ.भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.