जळगाव(प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आज प्रगती विद्यामंदिर येथे त्यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.यात विद्यार्थ्यांना मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती मिळून त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्द्येशाने ऑनलाईन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी ‘जीवनातील वाचनाचे महत्व अनन्यसाधारण आहे’.याविषयी मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या अध्यक्ष्या मंगलाताई दुनाखे यांनी ‘शिक्षकांनी नेहमी वाचन केले पाहिजे असे सांगितले’.याप्रसंगी डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयींची माहिती मुख्याद्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील तसेच ज्योती कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षकाना उद्बोधन केले.सूत्रसंचालन शिक्षक सुवर्णा पाटील यांनी तर आभार मनोज भालेराव यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षक संध्या अट्रावलकर, अनिल वाघ,अलका करणकर,पंकज नन्नवरे,रमेश ससाणे सुभाष शिरसाठ, रत्नप्रभा पवार,भाग्यश्री तळेले,दीपक बारी, विजया पाटील,हर्षा पाटील,सुभाष शिरसाठ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.