जळगांव- केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगांव येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘ एक पुस्तक ज्ञानासाठी ‘ या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ‘वाचन प्रेरणा दिन’ तसेच राष्ट्रीय हात धुवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , शाळेच्या मुख्या.रेखा पाटील , डि. ए. पाटील यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
समाजापरी आपले विशेष देणे असते ज्ञानदानाच्या अखंड प्रक्रियेमध्ये आपला सुद्धा खारीचा वाटा असावा या उद्दिष्टाने पालक शिक्षक संघाच्या मदतीने एक पुस्तक ज्ञानासाठी हा उपक्रम घेण्यात आला. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त खेळ, कथा , गोष्टी , राष्ट्रभक्ती , थोर पुरुष ,व्याकरण , चित्रकला अशा विविध विषयांची अवांतर ज्ञानाची पुस्तके यावेळी पालकांनी स्वतः शाळेला व विद्यार्थ्यांना भेट दिली. यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध झालेली असून शाळा सुरू झाल्यावर त्यांना ते वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्त प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यना ऑनलाईन पद्धतीने हात धुण्याचे महत्व हात कशा प्रकारे धुवावे हे प्रात्यक्षिक करून दाखवले व वैयक्तिक आरोग्य कसे चांगले ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.