Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

काशिनाथ पलोड शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

by Divya Jalgaon Team
October 15, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
news
जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूलमध्ये  भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिन शाळेत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इयत्ता आठवी  चे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया  माध्यमिक विभागाच्या  समन्वयिका  संगीता तळेले प्राथमिक विभागाच्या समन्वयिका स्वाती अहिरराव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हर्षित केसवानी याने डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती सांगून त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरी केली जाते हे सांगून वाचनाचे महत्त्व सांगितले .तर दिव्यांशी पात्रा , स्वयम् पाटील यांनी पुस्तक परीक्षण सादर केले.
तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जळगावातील प्रसिद्ध वक्ते श्री मनोज गोविंदवार यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते आणि विशेष म्हणजे ही मुलाखत त्यांचा मुलगा रेवार्थ गोविंदवार याने घेतली. या मुलाखतीतून गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सुरुवात कशी करावी,काय वाचावे,कसे वाचावे, जीवन जगत असताना आपण वाचलेले साहित्य कसे मार्गदर्शक, दिशा दर्शक ठरते याविषयी मार्गदर्शन केले,. यानंतर शाळेचे शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वाचनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती वाणी तर आभार प्रदर्शन आदित्य शर्मा या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री प्रशांत सोनवणे , मंजुषा भिडे ,भारती माळी अमर जंगले यांनी केले होते. तर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू निलेश बडगुजर अनिरुद्ध डावरे यांनी सांभाळली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Share post
Tags: Dr. A P J Abdul KalamJalgaonKashinath Palod SchoolVachan Prerana DinVivekand Pratistan
Previous Post

शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये

Next Post

प.वि.पाटील व झांबरे विद्यालयात ‘ एक पुस्तक ज्ञानासाठी’ उपक्रम

Next Post
Vachan prerana din news

प.वि.पाटील व झांबरे विद्यालयात ' एक पुस्तक ज्ञानासाठी' उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group