जळगाव – सरस्वती विद्या मंदिर येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
उज्वला ब्राम्हणकर, सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे, मानसी जगताप, सुदर्शन पाटील, गिरीष महाजन, तुषार पवार, सुलोचना पाटील, तेजस्विनी कचवे, शरद बिऱ्हाडे शिक्षकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. सुवर्णलता अडकमोल यांनीव्हाट्सएप्प पालक ग्रुप ऑनलाइन ऑडिओ क्लिप मधून विद्यार्थ्यांचे वाचन घेऊन वाचन दिवस साजरा केला.
यावेळी ग. स अध्यक्ष मनोज पाटील यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी वाचन करणे आवश्यक आहे वाचनामुळे आपल्या मनावर आणि विचारांवर संस्कार होत असतात असे मनोगत व्यक्त केले. ऑनलाइन वाचन दिवस उपक्रम घेतल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील माध्यमिक विभागाचा मुख्याध्यापिका दीपाली देवरे यांनी केले.