जळगाव – शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील व खानदेशातील सर्वात जुनी व महत्वाची मुस्लिम शैक्षणिक संस्था म्हणून अंजुमन तालीमुल मुस्लिमिन जळगाव अर्थातच अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव ही आहे. या संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक असून ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनी आपल्या प्रयत्नाने समाजाला व सार्वजनिक शैक्षणिक संस्थेस पॅरामेडिकल गटात मेडिकल लॅब टेक्नीशियन हे अभ्यासक्रम मिळवून आणल्याबद्दल त्यांचा जळगाव शहर मानियार बिरादरी व विविध संस्था तर्फे फारूक शेख व डॉ एजाज शेख यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला.
कलाम पॅरामेडिकल कॉलेजला जळगाव मान्यता
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण मंडळाने, महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग ,मुंबई. ,तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांचे दिनांक १९ नोव्हेंबर २० च्या आदेशानुसार प्रताप नगर मध्ये सुरू असलेल्या अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्येच कलाम पॅरामेडिकल कॉलेज जळगाव ला मान्यता देऊन २५ विद्यार्थ्यांची एक तुकडी, दोन वर्षे अभ्यासक्रमा साठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
हाजी गफ्फार मलिक यांची निस्वार्थ सेवेची दखल घ्या – फारूक शेख
हाजी गफ्फार मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्प संख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष असल्याने त्यांनी आपल्या वैयक्तिक अथवा कौटुंबिक शैक्षणिक संस्थेच्या- फाऊंडेशन च्या नावे सदरची मान्यता न आणता ज्या सार्वजनिक शैक्षणिक संस्थेत ते कार्यरत आहे व जी संस्था मुस्लिम समाजाची सर्वात जुनी संस्था आहे त्या संस्थेच्या नावे त्यांनी ही परवानगी आणल्याबद्दल संपूर्ण समाजाने व स्वार्थी शिक्षण सम्राट यांनी दखल घ्यावी असे भावोदगार महाराष्ट्र मन्यार बिरादरीचे तथा जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी मलिक यांचे गौरव करताना व्यक्त केले.
जळगाव मुस्लिम मानियार बिरादरी व इतर बिरादरी ने केले कौतुक
गफ्फार मलिक यांचे इदगाह कार्यालयात आगमन झाल्यावर उपस्थित जळगाव शहर मुस्लिम मानियार बिरादरी चे डॉक्टर एजाज शेख व फारुक शेख यांनी शाल व बुके देऊन गौरव केला त्यावेळेस अंजुमन तालीमुल मुस्लिमिन चे सलीम शेख, इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, व नजीर मुलतानी, मुलतानी बिरदारीचे शकिर मुलतानी,शिरसोली संस्थे चे अब्दुल नबी,मर्कज चे अब्दुल रउफ, व सलीम शेख,सालार नगर चे अहेमद शेख चोपडा चे नाझीम शेख आदींची उपस्थिती होती.