Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात 12 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

by Divya Jalgaon Team
November 24, 2020
in जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात 12 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जळगाव – वर्षानुवर्षे विविध कारणाने प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशनानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दि. 12 डिसेंबर, 2020 रोजी करण्यात आले आहे.

विधी व सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी या राष्ट्रीय लोकअदालतीचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ होणार आहे. या लोक अदालतीस जिल्हाधिकारी अभिजीत राउत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सतिश कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभणार आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते. असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय लोकअदालीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसूली होण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी  थकीत रक्कमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे.

तरी पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने काढण्यासाठी 12 डिसेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीत आपला सहभाग नोंदवून खटले त्वरीत निकालात काढून घेण्यसाठी पर्यायाने वेळ, पैसा यांची बचत करण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. कौ. हे. ठोंबरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonDivya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon newsजिल्ह्यात 12 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
Previous Post

हॉटेल प्रेसिडेंटच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जळगावच्या कलाम पॅरा मेडीकल कॉलेजला लॅब टेक्निशियन अभ्यासक्रमाची मान्यता

Next Post
जळगावच्या कलाम पॅरा मेडीकल कॉलेजला लॅब टेक्निशियन अभ्यासक्रमाची मान्यता

जळगावच्या कलाम पॅरा मेडीकल कॉलेजला लॅब टेक्निशियन अभ्यासक्रमाची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group