जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजही बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ५७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर –१३, जळगाव ग्रामीण- ०६, भुसावळ- ०७, अमळनेर- ०१, चोपडा-०३, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-००, एरंडोल-०१, जामनेर-०१,रावेर-०३, पारोळा-०२, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०१५, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ५७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार २३४ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ४८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ४६० रुग्ण सध्या उपचार घेताय.