रावेर – रावेरमध्ये आज भरड धान्य केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होते.
रावेर शहरातील मंगल कार्यालयात दोन शेतकऱ्यांचे आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, राजिव पाटील, गोंडु महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, निळकंठ चौधरी,
बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, खरेदी विक्री चेअरमन पी. आर. पाटील, व्हा.चेअरमन किशोर पाटील, एस. आर. चौधरी, यादवराव पाटील, जिजाबराव पाटील, सोपान पाटील, तुकाराम बोरोले, आर. के. चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, खरेदी विक्री संघ मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, डॉ. सुरेश पाटील, पुरवठा अधिकारी हर्षल पाटील आदींची उपस्थिती होती.