भुसावळ – चोरवड येथील विशाल दिनकर गुंजाळ ( गडकरी नगर , भुसावळ ) यांच्या शेतातून साठ हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरीला गेली आहे. गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरट्यांनी शेतातून लंपास केली बैलजोडी .
विशाल गुंजाळ ( गडकरी नगर ) यांनी त्यांच्या चोरवड मध्ये क्रमांक ३६/१/२, रविवार दि. २२ रोजी रात्री बैलजोडी बांधलेली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी ही बैलजोडी चारचाकी वाहनांमध्ये टाकून लंपास केली आहे. त्यामुळे विशाल गुंजाळ या शेतकऱ्याचे तब्बल ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुंजाळ यांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.