मुंबई- आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयात सक्तवसुली संचलनालय (ईडी)ने धडक दिली आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले आहे. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत. तसेच ईडीने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहांगला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नेले आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धडक.
आज मंगळवारी सकाळी ईडीच्या तीन टीमने तपासासाठी ईडीने स्थानिक पोलिसांची मदत न घेता सीआरपीएलचे ४० जवान घेऊन धाड टाकली आहे. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता शिवसेनेचे इतर काही नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनाही नोटीस मिळाल्याची चर्चा आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धडक.
तसेच या प्रकरणावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधत म्हटले आहे की, ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान, शिवसेना याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
अजून वाचा
फक्त १ रुपयांत खरेदी करा सोने ! PhonePe ची भन्नाट ऑफर