जळगाव – आज भाजपतर्फे टॉवर चौकात राज्य सरकारच्या विज बिल धोरणाच्या निषेधार्थ विज बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच महाविकास आघाडी सरकारने वीजबिलांमध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपच्या जिल्हा वसंत स्मृती कार्यालयापासून टॉवर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीजबिलांची होळी करून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनावेळी महापौर भारती सोनवणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, उपमहापौर सुनिल खडके, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, चेतन सनकत, डॉ. अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, अॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, जितेंद्र मराठे, अमित काळे, दीप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, पिंटू काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारने सामान्य जनतेची दिशाभूल केली असून, जनतेचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते . मात्र ते पूर्ण केलेले नाही. याशिवाय सामान्य जनता वीजबिल भरू शकत नसल्याने महावितरणकडून वीज कनेक्शन तोडले जात आहे. भाजपाने कधीही सामान्य जनतेला वेठीस धरले नव्हते. मात्र महाविकास आघाडी सरकार सामान्य जनतेला वेठीस धरीत असून वीज बिल माफ करावे अशी मागणी
यावेळी केली.