जळगाव – रविवारी सायंकाळी शहरातील रामदास कॉलनी येथून घराच्या आवारात लावलेली दुचाकी अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अनिल नारायण मुनेश्वर (वय-२७ रा. किनी ता. भोकर जि. नांदेड ह.मु. रामदास कॉलनी जळगाव) हे खासगी नोकरी करतात. कामावर ये-जा करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच २६ एएक्स ६३४४) क्रमांकाची दुचाकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते घरी बसून काम करतात. दुपारी १२. ३० वाजता दुचाकी घराच्या आवारात पार्कींगला लावली.
सायंकाळी ६.३० वाजता दुचाकी दिसली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली दुचाकी मिळून आली नाही. आज सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देवून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.