जळगाव- अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार असून त्यांच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली.
यात त्यांनी अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्याबाबतची माहिती पवार यांना दिली. तसेच आगामी काळात भाजपमधील अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार असून याबाबतची चर्चा त्यांनी शरद पवार यांच्यासोबत केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत अल्पसंख्यांक आघाडीचे विभागीय सरचिटणीस अक्रम तेली हे देखील उपस्थित होते.