जळगाव – आज सकाळी तहसील कार्यालयाकडून शिवाजीनगरकडे जाणार्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्याने तहसील ऑफीसजवळून अनेक जण रेल्वे रूळांना ओलांडून ये-जा करत असतात. यात अनेक जण धोकादायक पध्दतीने रूळ ओलांडतात.
मात्र आज सकाळी जळगावहून भुसावळकडे जाणार्या मालगाडीच्या खाली आल्याने एक जणाचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत परिसरातील नागरिकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली . सुमारे अर्ध्या तासानंतर रेल्वे पोलीस आले. मात्र तोवर त्याचे प्राण गेले होते. संबंधीत मृत व्यक्तीचे नाव कळू शकले नाही.